Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशन नागपूर यांचा उपक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर: रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा नागपूर व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने दि. 25/09/2021 ला मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश खंगार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. शरद जोशी पशुविकास अधिकारी नागपूर यांनी पशुपालकांना गाय, म्हशी , बैल , शेळी , कोंबड्यान वरती पोक्षक आहार आपण कशा पद्धतीने जनावरांना देऊ शकतो व तो कसा घरच्या घरी तयार करता येतो यावर मार्गदर्शन केले. तसेच गोठ्याचे व जनावरांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले.
त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शन म्हणुन डॉ सारीपुत लांडगे, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, तथा तांत्रिक अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय माफसु, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर , यांनी पशुपालकांना शेळी पालन व कुकुट पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यानी जोंडधंदा म्हणुन बघितले पाहिजे , तसेच शेळी व कुकुट पालन यामुळे शेतकऱ्याना किती फायदा होऊ शकतो यांचे आर्थिक समीकरण सुद्धा पटवुन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील , 2 तालुका येथील 7 गावातील 31 पशुपालकांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत पशुपालकांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व पशुपालकांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.