Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

देसाईगंज : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादुत प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण पंधरवडा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात 5 जून ते 20 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यातील एक भाग म्हणून गडचिरोली समतादूत प्रकल्पाच्या वतीने प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या मार्गदर्शनातून सदर पंधरवडा राबविण्यात येत आहे.

कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव व प्राणवायूची असलेली कमतरता लक्षात घेता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे अतिशय महत्त्वाचे आहे, हाच उद्देश समोर ठेवून समतादूत मार्फत वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे बार्टी कडून आवाहन करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज उपविभागीय कार्यालय येथे विशाल मेश्राम (उपविभागीय अधिकारी) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी श्रिकांत कर्नेवार, विद्या गणवीर, विनोद चट्टे, डी. पी. भैसारे, डी. एस. पडवे, वंदना धोंगडे (समतादूत) व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम वंदना धोंगडे यांनी आयोजन केले होते.

हे देखील वाचा :

रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – डॉ. आशीष विटनकर

माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत

 

 

Comments are closed.