Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सावली तालुक्यातील देवटोक (सिर्सी) येथे खोदकामा दरम्यान आढळले शिवलिंग

खा. अशोक नेते यांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सावली : सावली तालुक्यातील वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या देवटोक (सिर्सी) येथील श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मूर्कुंडेश्वर देवस्थान समोर बांधकामासाठी खोदकाम करीत असतांना भगवान शंकराची पिंड आढळून आली. 2 फूट खोल खोदकाम केल्यानंतर महादेवाची पिंड आढळल्याने खोदकाम थांबवून पिंड सभोवतालचा भाग स्वच्छ करण्यात आला व  मार्कंडादेव या पावन स्थळावरील पाणी आणून शिवलिंग स्वच्छ करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती मिळताच भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी देवटोक येथे जावुन पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मूर्कुंडेश्वर देवस्थान परिसराची पाहणी केली व शिवलिंगाचे दर्शन घेतले. व याबाबतची माहिती जाणून घेतली. याठिकाणी भगवान शंकर महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यास सांगितले व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवटोक येथील महाराजांनी लॉकडाऊन बंद झाल्याबरोबर मंदिर बांधकाम सुरू करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाशजी पाल, महामंत्री सतिश बोम्मावार, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलासजी भांडेकर, सावली शहर अध्यक्ष आशिष कारेकर, सोशल मीडिया चे मयूर व्यास, हरीश जक्कुलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसाट, पत्रकार सुरज बोम्मावार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

संतापजनक! पाच वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

 

Comments are closed.