Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेमसंबंधातून आत्महत्येचा प्रयत्न; अल्पवयीन मुलगी आणि विवाहित पुरुष गंभीर अवस्थेत रुग्णालयात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती, १९ मे – प्रेमसंबंधाच्या सामाजिक वय, वैवाहिक जबाबदाऱ्या आणि नैतिकतेच्या सीमारेषा पार करत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका जीर्ण इमारतीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि ३९ वर्षीय विवाहित पुरुषाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या दोघांनाही गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तळेगाव ठाकूर फाट्याजवळील एका निर्मनुष्य आणि जीर्ण इमारतीत उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे प्रेमी युगुल मागील तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघेही अर्धबेशुद्ध अवस्थेत या इमारतीत आढळून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी तातडीने दोघांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना तत्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांचीही स्थिती चिंताजनक असून, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

या घटनेतील पुरूष विवाहित असून त्याला पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तर संबंधित मुलगी फक्त १६ वर्षांची असून ती अल्पवयीन असल्याने या प्रकरणात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तिवसा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अमरावती ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्रेमसंबंधातून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.