Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपुर: ‘५ जून’ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपुर तर्फे चंद्रपुर, नागपूर, अमरावती, पुणे, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, गोंडपिपरी, राजुरा, मुल, सिंदेवाही, नागभीड, कळमेश्वर, नरखेड, हिंगणघाट, अर्जनी मोरगाव आणि इतर ठिकाणी वृक्षारोपण पार पडले. यावेळी पर्यावरण दिनाचे आणि वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यात आले.

वृक्षारोपण उपक्रमाला चंद्रपुरमध्ये मुन्ना तावाडे, इंजि. नरेंद्र डोंगरे, श्याम म्हशाखेत्री, प्रलय म्हशाखेत्री, पूनम रामटेके, नागपूर जिल्हात श्रुतिका अंजनकर, अबोली खुशवाहा, भावना कोवाचे, तेजल वंजारी, करिश्मा खोब्रागडे, चेतना मरसकोल्हे, पुजा सराटे, पुणे जिल्हात पल्लवी बिंझाडे, निकिता सलामे, श्रुती वानखेडे, मोहित सोटीया, अमरावती जिल्हात तृप्ती साव, वैष्णवी बंड, नम्रता चौधरी, गडचिरोली जिल्हात स्नेहा चालूरकर, प्रीतम गग्गुरी, सुहास चालूरकर, गोंदिया जिल्हात अश्विनी पेंढारकर, वर्धा जिल्हात प्रतीक भगत, यवतमाळ जिल्हात विक्की कावळे, गोंडपिपरी तालुक्यात सिद्धार्थ दहागावकर, महेश तोहोगावकर, आशीष दहागावकर, आयुष झाडे, अर्णव झाडे, हार्दिक झाडे, संघदीप मुंजनकर, आशिष अलोने, दिलीप मुंजनकर, अनिल अलोने, सुरज पि. दहागावकर, सिंदेवाही तालुक्यात वृषाली केकरे, कळमेश्वर तालुक्यात मध्ये दिनेश मंडपे, निकिता ताले, हिंगणघाटमध्ये निखिता रामटेके, राजुरा तालुक्यात विशाल शेंडे, प्रतीक्षा वासनिक, कोरपना तालुक्यात अस्मिता वाघमारे, नागभीड तालुक्यात नैना घुगुस्कर, मुल तालुक्यात रेणुका चुदरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात आकाश रामटेके, रत्नदीप लांडगे, नरखेड तालुक्यात आदर्श टेकाम आणि इतर सदस्यांनी विविध ठिकाणी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने वृक्षारोपण,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन ..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 

Comments are closed.