Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदार जागृती स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २१फेब्रुवारी: भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे.  सदरच्या माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. यामधे प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडिओ चित्रण स्पर्धा, भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा, गायन स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा इत्यादींचा समावेश आहे. मा.भारत निवडणूक आयोगाव्दारे सदरच्या स्पर्धेचे नियोजन २५ जानेवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ दरम्यान नियोजन केले आहे. यामध्ये विविध श्रेणी आणि विविध पारितोषिके आहेत. याविषयी सविस्तर माहिती वेबसाईटवरून प्राप्त करता येईल. (https://ecisveep.nic.in). स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असल्यामुळे स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखिल वाचा :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हळदीच्या कार्यक्रमात घडला असा प्रकार कि, चक्क नवरदेवाला व्हावे लागले फरार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!

Comments are closed.