Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

४०७ गावांचे दारूमुक्त निवडणूकचा ठराव

  • दारू पाजणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचा निर्णय.
  • ३ हजाराहून अधिक उमेदवारांचा संकल्प.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली 14 जानेवारी:– जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १५ आणि २० जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या आहे. मतदारांना स्वतःकडे आकर्षित करीत निवडणून येण्यासाठी उमेदवारांची शर्यत बघावयास मिळत आहे. गावाच्या विकासासाठी दारूमुक्त निवडणूक अतिशय महत्वाची असून मुक्तिपथने ‘दारूमुक्त निवडणूक’ अभियान राबविले आहे. विधानसभा व लोकसभेप्रमाणेच  ग्रामपंचायत निवडणुक सुद्धा दारूमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तिपथ अभियानाचा आहे. आतापर्यंत ४०७ गावांनी ठराव घेतला आहे. ‘मी मतदारांना दारूचे अमिश दाखवणार नाही’, असा संकल्प ३ हजाराहून अधिक उमेदवारांनी केला आहे. ही संकल्पना राबविणारा गडचिरोली एकमेव जिल्हा ठरला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विधानसभा व लोकसभा निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गावा-गावातून सभा घेऊन ठराव घेतले होते. उभे असलेल्या प्रत्येक उमेदवारांकडून ‘निवडणुकी दरम्यान दारू वाटप करणार नाही, मी दारूबंदीचे समर्थन करतो’. असे संकल्प पत्र लिहून घेतले होते. उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान दारूचा वापर करू देणार नाही, दारू स्वीकार करणार नाही तसेच शुद्धीत राहूनच मतदान करणार, असे गावकऱ्यांनी ठरवून मागील विधानसभा व लोकसभा निवडणूक यशस्वी केली. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मतदार व प्रशासन देखील सहकार्य करीत आहे. दारूमुक्त निवडणुकीसंदर्भात गावागावात जनजागृती करीत ठराव घेणे. वचननामावर उमेदवार व पॅनल प्रमुखांची स्वाक्षरी घेणे. गाव संघटनेच्या माध्यमातून अहिंसक कृती करणे. दारूविक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन करणे. अशा पद्धतीने यंदाची निवडणूक, दारूमुक्त निवडणूक होणार.     

 गावाच्या हितासाठी ग्रामपंचायत दारूमुक्त असणे आणि निरोगी लोकशाहीसाठी निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी गावातून ठराव घेत उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, दारूच्या नशेत मतदान करणार नाही. असा निश्चय केल्या जात आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक प्रत्येक उमेदवारांकडून ‘निवडणूक काळात ‘मी दारूचे वाटप करणार नाही, दारूचे सेवन करणार नाही’ असा वचननामा लिहून घेतल्या जात आहे. सोबतच पॅनल प्रमुख सुद्धा गावकऱ्यांना वचन देत आहे की, दारू पीत नाही अशाच उमेदवारांना आम्ही निवडणुकीत उभे करू, आम्ही व आमचे उमेदवार मत मिळविण्यासाठी दारू वाटणार नाही. गावाच्या व जिल्ह्याच्या दारूबंदीचे आमचे पॅनल पूर्ण समर्थन करते. अशा आशयाच्या पत्रावर पॅनल प्रमुखाची सुद्धा स्वाक्षरी घेतल्या जात आहे. आतापर्यंत ३ हजार उमदेवारांनी दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला आहे. ४०७ गावांनी ठराव घेतला आहे. हा नावीन्य उपक्रम सुरु करणारा एकमेव गडचिरोली जिल्हा ठरला आहे. 

Comments are closed.