Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे चंद्रपूरात पडसाद

चंद्रपूर कडकडीत बंद,सकल हिंदू समाजाने केला निषेध..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर : बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार लक्षात घेता येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने ‘आक्रोश मोर्चा ‘चे आयोजन शुक्रवारी(दि.23) करण्यात आले.या मोर्चाच्या समर्थनात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्याचा सामूहिक निर्णय 2 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. यात अनेक हिंदू संघटनांना पाचारण करण्यात आले.ठरल्या प्रमाणे शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता शिवाजी चौक येथे सकल हिंदू समाजाचे एकत्रीकरण झाल्यावर आक्रोश मोर्चा गांधी चौक-जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.तब्बल 3 तास चाललेल्या या मोर्चात बांगलादेश व पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चेकरूंनी आक्रोश केला.

या विशाल आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला,रोडमल गहलोत,रामकिशोर सारडा,मिलिंद कोतपल्लीवार,गुणवंत चंदनखेडे,दामोदर मंत्री,अजय जयस्वाल, रणजीतसिंग सलुजा,ग्यानचंद टहलियानी, यशवंत कलमवार,मधुसुदन रुंगठा,अशोक हासानी
रीतेश वर्मा,प्रा.जुगलकिशोर सोमानी,विनोद कुमार तिवारी,डॉ.शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली.बांगलादेशाचा यावेळी सर्वांनी निषेध नोंदविला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालकमंत्री व स्थानिक आमदाराची उपस्थिती..

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने जनतेला आवाहन केले होते.याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चात शेवटपर्यंत सहभाग नोंदविला.यावेळी पत्रकारांशी बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले,बंगलादेशातील जनता सत्तेविरुद्ध पेटून उठल्याने पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घ्यावी लागली.असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत.हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे.मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार आहे.हिंदूंवरीलचं नाही तर कोणत्याही समाजावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही.

मातृशक्ती व तरुणाईची उल्लेखनीय उपस्थिती…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिंदूधर्मरक्षणासाठी निघलेल्या या आक्रोश मोर्चात मातृशक्ती व तरुणाईने मोठया संख्येने सहभाग नोंदविला.तरुणाईने भगवा ध्वज तर मातृशक्तीने निषेधाचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

हे देखील वाचा,

https://www.youtube.com/watch?v=Ld0tC_UCa7U&t=53s&pp=ygUc4KSy4KWL4KSV4KS44KWN4KSq4KSw4KWN4KS2IA%3D%3D

Comments are closed.