Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नीलगायची शिकार करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १८ फेब्रुवारी : गडचिरोली शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर परिसरात नीलगायची शिकार केल्याची घटना गुरुवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजताच्या  दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेत चार नावे चौकशीत समोर आल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरु असताना घटनेत सहभागी असलेले दोघेजण फरार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यानी दिली आहे.

गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे नीलगायचे शिकार केल्याची गोपनीय माहिती वनविभागाला प्राप्त झाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने गोविंदपूर गाठून पत्रूजी भांडेकर यांच्या घरी चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांच्या घरामागे शिजवलेले नीलगायचे मांस कचराकुंडीत आढळून आले. तसेच ज्या ठिकाणहून मांस खरेदी करण्यात आले. त्याठिकाणी अधिक तपास केला असता तनसीमध्ये (धानाचे गवत) चार किलो मांस लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी वनकर्मचाऱ्याने निलगायचे मांस जप्त करून सदर मांस पशूवैद्यकिय अधिकारी यांच्याद्वारे फॉरेंसिक लॅॅबकडे तपासणी करीता पाठविण्यात आले. तर या घटनेची माहिती मुख्य आरोपींना होताच दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा मागोवा  वनकर्मचारी घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेचा पुढील तपास गडचिरोली वनविभागाचे सहायक वनरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात अरविंद पेंदाम वनपरिक्षेञ अधिकारी, मिलींद उमरे मानद वन्यजिवरक्षक, अजय कुकूडकर वन्यजिवप्रेमी, अरूप कन्नमवार क्षेञसहायक गुरवळा, डि. एन. दुर्गमवार, गुरू वाढई वनरक्षक, प्रियंका रायपुरे वनरक्षक, क्रिष्ना मडावी, निलकंठ गेडाम अध्यक्ष सं. व. समिती गुरवळा , मक्सुद सय्यद, विलास भोयर, देविदास सोदुरवार, व इत्यादी वनकर्मचारी तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

हे सरकार लोफर आहे – माजी ऊर्जामंत्री बावनकुडे यांची घणाघाती टीका

पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

 

Comments are closed.