खून करणाऱ्या आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील सोमंनपल्ली येथे ६ नोव्हेबरला मनोज आनंदराव मेकर्लावार या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटविण्यात आलेला होता. परंतु मृतुदेह अर्धवट जळालेला आढळल्याने सदर गुन्हाची वाचा फुटली .
सोमंनपल्ली येथील सचिन मेकर्लावार व त्याच्या काही मित्रांनी पार्टी करण्यासाठी कोबडा दिला नाही म्हणुन पुतण्या मनोज आनंदराव मेकर्लावार यास अमानुष मारहाण केली त्यात त्याचा मृत्यु झाला. मारहाण करून ठार केल्याबाबत चुलत काका व त्याच्या मित्रांना आष्टी पोलिसांनी अटक करून त्यांना दि ८ नोव्हेंबर रोजी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Comments are closed.