उद्धव ठाकरेंनी नांदेड मधील सभेत महाविकास आघाडीची सत्ता आली तर लाडक्या बहिणींना ३००० रुपये देण्याचे आश्वासन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडच्या लोहामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. गद्दार आहेत , माझ्यावरती आरोप करतात विचार सोडले , विचार सोडले नाही, निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा. केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन लढता. त्यांच्या युतीत ईडी , सीबीआय , आहेत . माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता, आता तेवीस तारखेला तुम्हालाही जनता तडीपार करणार आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
ज्यांनी आपली शिवसेना चोरली, त्या चोरांच्या हातात, गद्दारांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का? नांदेडमध्ये शिवसेनेनं खूप मेहनत केली. वसंतराव मला भेटले होते, तेव्हा त्यांनी नांदेडमध्ये मला सभा घेण्याची विनंती केली. मात्र दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत. पण आता त्यांचा वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. आघाडी धर्म आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला माझं आव्हान आहे, आमचे उमेदवार तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणतो. खेचा खेची झाली तर नुकसान होईल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंधराशे रुपयांमध्ये तुमचं घर तरी चालतं का? तुमचे पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत की, महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 देणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Comments are closed.