Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे सिडनी कसोटी अनिर्णीत ;मालिका १-१ बरोबरीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

सिडनी ,११जानेवारी:- हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने  आणि हनुमा विहारीने या जोडगोळीने तब्बल ४३ षटकं खेळून काढून सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका बजाविली. विशेष म्हणजे दुखापत होऊनही विहारीने 161 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे विजय दृष्टीक्षेपात होता. पंतच्या वेगवान खेळीने भारत विजयाकडे आगेकूच करत असतना  विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयाची आस लागलेल्या भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला विकेट्स जाऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती. हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिडनीमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना रंगला. भारताला दुसऱ्या डावात 132 चेंडूंमध्ये 407 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने 131 षटकं फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 338 धावा केल्या. हेमस्ट्रिंग इंज्युरी असतानाही हनुमा विहारीने 161 चेंडूंचा सामना करत 23 धावांची नाबाद खेळी रचली. त्याला आर अश्विननेही उत्तम साथ दिली आणि नाबाद 39 धावा केल्या. या दोघांनी 43 षटकं खेळून भारताला सिडनी कसोटीत पराभवापासून वाचवलं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या. तर टीम इंडियाचा पहिला डावा 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. या 94 धावांच्या आघाडीसह कांगारुंनी दुसऱ्या डावात आणखी 312 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 81 धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने 73 धावा केल्या. कांगारुंनी दुसरा डाव 312-6 धावसंख्या असताना डाव घोषित केला.यामुळे ऑस्ट्रेलियाला 407 धावांचे तगडे आव्हान मिळाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.