Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्कर मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून १० कोटी रुपये देण्याचे केले जाहीर

सिरोंचा येथे एप्रिलमध्ये होणार्‍या पुष्कर मेळाव्याबाबत घेतला आढावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : प्राणहिता नदीवर दर बारा वर्षांनी भरणारा पुष्कर मेळावा येत्या एप्रिलमध्ये संपन्न होणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील स्थानिक प्रशासनाबरोबर तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर तयारीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पूर्व नियोजनाबाबत आवश्यक निधीसाठी जिल्हा नियोजन मधील १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.

तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेही प्रस्ताव सादर केला आहे अतिरिक्त निधी बाबत संबंधित विभागाचे मंत्री महोदय यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम उपस्थित होत्या..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील नदी घाटावर तेलंगणा, छत्तीसगड सह महाराष्ट्रातील लाखो भाविक स्नान करण्यासाठी व कालेश्वरम येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. एप्रिल महिन्यात होणाऱ्या पुष्कर मेळाव्या बाबत जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू असून येत्या काळात कोणतेही अडचणी भाविकांना येऊ नये म्हणून गतीने कामे केली जाणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच

 

 

 

Comments are closed.