Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर स्पष्टीकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क,दि. २५ डिसेंबर :  राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं.

ठळक मुद्दे : 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • राज्यात यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट नाही, परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू.
  • ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता, त्यामूळेच निर्बंध लागू केले. 
  • आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या सीबीआय चौकशीची गरज नसून पोलिसांचा तपास योग्य रित्या चालू आहे. 
आरोग्य भारती परीक्षा बाबत  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोग्य भरतीतील परीक्षा बाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षेबाबत पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे. असंही टोपे यांनी सांगितलं.

आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही असंही टोपे यांनी सांगितलं आहे. ते जालन्यात बोलत होते.इथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही असंही टोपे यांनी सांगितलं आहे.परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय

केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचा असून याबाबत आता निर्णय घ्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली १२ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्या साठी केंद्राकडे मागणी केली असून याबाबत निर्णय व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले.

हॉटेल बंद नाही, पण निर्बंध कायम

हॉटेल मध्ये मर्यादा घालून दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त गर्दी होऊ नये असंही टोपे म्हणाले. राज्यात जवळपास १०० ओमायक्रोनचे रुग्ण आहे. राज्यात पहिला डोस ८७ टक्के लोकांनी घेतला असून दुसरा डोस ५७ टक्के लोंकांनी घेतला आहे. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल असं ही टोपे म्हणाले. राज्यात दररोज ६  ते ७ लाख लसीकरण होत असून लसीकरण वाढवण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांनी रात्रभर हॉटेल सुरू करण्याची मागणी केली आहे यावर टोपे यांनी नियम पाळून हॉटेल सुरू ठेवाव्या असं म्हटलं आहे. लॉकडाउनसाठी आपण ८०० मॅट्रिक टन ऑक्सीजन वापराची मर्यादा ठेवली होती पण ओमायक्रोनचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही मर्यादा आता घटवून ८०० वरून ५०० वर आणावी लागेल असा ईशारा देखील त्यांनी दिला.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करू नये

हॉलमध्ये सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमासाठी तसेच लग्नात हॉलच्या क्षमतेपेक्षा २५ टक्के म्हणजे १०० लोक असावे तर लग्न समारंभात ओपन स्पेसला २५० लोक इतकी मर्यादा घालून देण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. या दरम्यान ५ पेक्षा अधिक लोकांनी ऐकत्र येऊ नये. हॉटेलमध्ये केवळ ५० टक्के लोकांनी असावं. त्यापेक्षा गर्दी करु नये. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

भविष्यात तिसरी लाट ओमिक्रॉनचीच 

यूरोपमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोना नियम पाळले पाहिजे असं आवाहन टोपे यांनी केलं. आता सध्या राज्यात  कोरोनाचे १ हजार ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून भविष्यात तिसरी लाट ओमिओक्रोनची असेल असं भाकीत देखील टोपे यांनी व्यक्त केलं. ओमायक्रोनमध्ये ऑक्सिजनची जास्त गरज पडणार नाही. ओमायक्रोन रुग्ण संख्यावाढत असल्याने निर्बंध लागू केल्याचं देखील टोपे म्हणाले.

तर ऑक्सिजनची गरज लागेल

ओमिक्रॉनचाही संसर्ग वाढत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० वर गेली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

हे देखील वाचा : 

आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन

टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

डॉ.बबन जोगदंड यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

 

 

Comments are closed.