Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट

सुनसगावाजवळील कंपनीतील घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भुसावळ, दि. २१ जानेवारी :  भुसावळ तालुक्यातील सुनसगावानजीक असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे रा. खेडी रोड जळगाव आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. झालेल्या स्फोटात मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असुन परिसरातील नागरीकांनी कंपनीकडे धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत सुरु केली. सदर घटनेमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या स्फोटात आणखी काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला असून मयत झालेले कर्मचाऱ्यांचा अधिक तपास सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नक्षलग्रस्त जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष बाब म्हणून अधिकचा निधी देवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

दिनांक 12 मार्च, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.