Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांचा नावाने कर्ज घेऊन फसवणूक करणारे रत्नाकर गुट्टे यांच्यावर ‘ईडी’ ची कारवाई

  • आ. गुट्टेंची २५५ कोटींची मालमत्ता जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गंगाखेड, दि. २४ डिसेंबर: साखर कारखान्याला खड्ड्यात घालून हजारो कोटींची संपत्ती कमावणारे  आणि तुरुंगात राहुनही आमदारकीची निवडणूक जिंकणारे, परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे  राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केली आहे. कृषी कर्ज घोटाळ्यातील वसुली करण्याकरिता ईडीने ही कारवाई केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ईडीने मोठी कारवाई करत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडसह तीन कंपन्यांची सुमारे २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने जीएसईएलशिवाय योगेश्वरी हॅचरिज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेड विरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या तिन्ही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करीत गंगाखेडमध्ये आ. रत्नाकर गुट्टे यांनी उद्योग उभारला. त्यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने ही कारवाई केली. ईडीने केलेल्या कारवाईमध्ये जीएसईएल कंपनीची २४७ कोटी रुपये किमतीची यंत्रे, जीएसईएलची पाच कोटी रुपये किमतीची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि जीएसईएलच्या १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे समभाग आदी मालमत्ता जप्त केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे वाचा – New Corona :- इंग्लंडवरुन आलेला नागपूरचा तरुण कोरोनाबाधित

Comments are closed.