Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्याने विहिरित उड़ी मारूंन संपविली जीवनयात्रा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव येथील नीलकंठ फकीरा आमने वय (43) वर्ष यांनी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी 15 नोव्हें :- सततची नापिकी व या वर्षीच्या महापुराने झालेली पिकाची हाणी, आणि त्यातूनच कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव येथील नीलकंठ फकीरा आमने वय (43) वर्ष यांनी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नांदगाव येथील एक सदन शेतकरी असून शेतीवरंच उदरनिर्वाह चालत असे, मात्र यावर्षीच्या महापुरामुळे संपूर्ण शेती ही पाण्याखाली आल्याने धान व कापूस पूर्णत: नेस्तानाबूत झाले आणि अशातच बुडालेल्या पिकाची नुकसान भरपाई ही दिवाळीपर्यंत मिळेल आणि आपली दिवाळी अगदी आनंदात जाईल अशी अपेक्षा असताना शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे मिळणारी मदत ही अजून पर्यंत मिळालीच नाही. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरले होते असल्याची खंत हा नेहमी गावातील लोका समोर बोलून दाखवत होता. अशातच दिवाळीसारखा सण जर एवढया दुःखात जात असेल तर आपल्यावरील असलेले कर्ज आपण फेडायचे कसे ? हा प्रश्न नेहमी त्याला भेडसावत होता. त्याच विचारात तो नेहमी राहत असे ,अखेर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्याने आपल्या घराजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्यात त्याला आई वडील दोन मूल आणि पत्नी असा आप्त परिवार असून. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.