Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार!

Get real time updates directly on you device, subscribe now.

भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे डेस्क २६ नोव्हेंबर :- राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने पहिली मोठी घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक होते. पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे.राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आाणि राष्टवरादीची आघाडी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी लढविणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्यांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माझे लक्ष आहे, असं जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं.

निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेने दंड थोपटले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सुद्धा त्यांना शह देण्यासाठी चांगली एकता तयार करेल. महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.