Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था  : भारतात सुरू असणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. एका अभ्यासातून असे पुढे आले आहे कि, दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लस अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. अनेक देश लसीकरणाच्या दोन डोसमध्ये मोठे अंतर ठेवत आहेत. ब्रिटनमध्ये हे दोन्ही डोस 12 आठवड्यांच्या अंतराने दिले जात आहेत. तर, कॅनडामध्ये हे अंतर 16 आठवड्यांचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही डोसच्या मध्ये ठेवण्यात येणाऱ्या अंतरामुळे प्रतिकारशक्ती वाढते. कंपनीनंही असा दावा केला आहे, की लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास त्याचा प्रभाव 28 टक्क्यांनी वाढतो.

पुढच्या आठवड्यात निर्णय होणार?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लसीच्या डोसबाबतचा हा निर्णय पॅनल पुढच्या आठवड्यात घेऊ शकते. मार्चमध्ये द लैंसेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतराने घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन डोस सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ 55.1 टक्केच होतो. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर याआधीच 4-6 आठवड्यांवरुन वाढवून 6-8 आठवडे करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी एप्रिल महिन्यातच याबाबत निर्णय घेतला होता. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की यामुळे लसीच्या पुरवठा साखळीवरील दबावही कमी होण्यास मदत होईल. या गोष्टीचा लसीकरणाच्या नव्या टप्प्यात फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा

…अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले

Comments are closed.