Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सांगली शहरात घुसला बिबटया; राजवाडा चौकात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. ३१ मार्च: सांगली शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक परिसरामध्ये एका कुत्र्याला फाडून टाकण्यात आले असून घटनास्थळी सापडलेल्या ठश्यावरून वन अधिकाऱ्यांनी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप वन विभाग किंवा शासकीय अधिकाऱ्यांना हा बिबट्या दिसून आला नाही, मात्र नागरिकांकडून बिबटया दिसल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या व्यक्तींचा शोध घेऊन जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटेच्या सुमारास शहरात हा बिबटया दिसला, त्यांनतर सकाळच्या सुमारास हॉटेल राजवाडा चौक परिसरात या ठिकाणी असणारे चहा विक्रेत्याला बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि वन विभाग आणि अग्निशमन दलाने याठिकाणी घटनास्थळी धाव घेत त्याची शोध मोहीम सुरू केलेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजवाडा चौक मधील पालिकेच्या व्यापारी संकुलात भटक्या कुत्र्याला फाडून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर त्याठिकाणी आढळलेल्या ठस्यावरून वन विभागाकडून हे बिबट्याचे ठसे असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले असून त्याच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. वन विभाग, महापालिका प्रशासन आणि पोलिस विभागाच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या आल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.