Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी..

रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या छबिन्यामध्ये घडला प्रकार. पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
महाड तालुक्यातील विरेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे छबिना उत्सव साजरा होतो. या छबिना उत्सवासाठी खूप लांबून लांबून भाविक वीरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येतात. सलग दोन वर्ष कोरोनामुळे कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करता आला नाही.

रायगड, दि. ५ मार्च : महाडमधील छबिना उत्सवामध्ये काल मध्यरात्री अपघात झाला असुन या अपघातामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे. पल्लवी सुरज कोलणकर (३०) रा. निजामपुर तालुका माणगाव असे या जखमी महिलेचे नाव आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पल्लवी कोलणकर या छबिना उत्सवासाठी महाड येथे आल्या होत्या. त्यांनी छबिना येथे लावण्यात आलेल्या हलत्या पाळण्याचा लाभ घेत त्यात बसल्या होत्या. त्यावेळी फिरत्या पाळण्यात या महिलेचे केस अडकले आणि डोक्यावरील चामडीसह निघुन गेले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी महिलेला मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी इंदल दयाराम चौहान याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पाळण्याचे मालक आरोपी इंदल दयाराम चौहांन राहणार उत्तर प्रदेश याने या छबिना उत्सवासाठी हाताने हलविणारा पाळणा आणला होता. या पाळण्याचा आनंद घेण्यासाठी, पल्लवी या पाळण्यामध्ये बसल्या होत्या.

आरोपी इंदल चौहांन याने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणाने, निष्काळजीपणाने, पाळणा हलवीत असताना पल्लवी यांचे केस त्या पाळण्यामध्ये अडकून त्यांच्या डोक्यावरची कातडी निघाल्यामुळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवी यांना उपचारासाठी पाठविले. जखम गंभीररित्या असल्यामुळे पल्लवी यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम ३३७,३३८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे व पोलीस निरीक्षक खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बामणे हे करीत आहेत.

हे देखील वाचा : 

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

 

 

Comments are closed.