Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेंगलोर येथील ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी

गोडंवाना विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि १७ मार्च :  युवक कल्याण व खेळ मंत्रालय कर्नाटक व कर्नाटक राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजीव गांधी आरोग्य व विज्ञान विद्यापीठ द्वारे ,”राष्ट्रीय एकात्मता शिबीर”, श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स बंगलोर येथे १६ ते २२ मार्च दरम्यान संपन्न होत आहे.

या शिबीरमध्ये भारतातील विविध विद्यापिठातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी होत आहे. या शिबिरात राष्ट्रीय सौधाऱ्य, पारंपरिक संस्कृती, भारतीय राज्यघटना ,जीवन मुल्य आणि भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात येते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र व गोवा राज्य तर्फे हरडे महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी आणि रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे विभागीय समन्वयक आणि गणतंत्र दिवस परेड शिबिर – २०२२ (आर. डी. परेड २०२२) चे लिडर डॉ. पवन रमेश नाईक यांना संघनायक म्हणून पाठविण्यात आले आहे. त्याच्या सोबत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नीत महाविद्यालयातुन ५ मुली व ५ मुले यांची निवड झाली आहे.

गोंडवाना विद्यापीठ यावर्षी प्रथमच राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झाले आहे. हे विशेष गोंडावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झे,. चिताडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शाम खंडारे यांचे मोलाचे परिश्रम आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Comments are closed.