Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेल्फीचा नाद जीवावर बेतला.. चार महिला बुडाल्या ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. १६ ऑक्टोंबर : हा सेल्फीचा नाद नाही चांगला ! हल्ली कुठल्याही पिकांनी स्पॉट वर गेल्यावर सेल्फी काढण्याची स्टाईल सुरू झाली आहे. त्यामुळे अशा अनेक दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक जीवघेणी घटना पालघर तालुक्यातील वैतरणा नदीवर घडली आहे. यात दोन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे.

एकफोटो काढण्याच्या नादात तोल जाऊन वैतरणा नदीत दोन मुली बुडाल्याची घटना काल घडली आहे. वैतरणा फणसपाडा जेट्टीवर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात दोघींचा मृत्यू झाला असून विरार पोलीस आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रात्रीभर शोधकार्य सुरूच होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चार मैत्रिणी जेट्टीवर फिरायला गेल्या होत्या

चार मैत्रिणींचा ग्रुप शनिवारी वैतरणा फणसवाडा जेट्टीवर फिरायला गेल्या होत्या. जेट्टीवर फोटो, सेल्फी फोटो काढत असताना एकीचा तोल गेला. तिला वाचविण्यासाठी सोबतच्या तीन जणी गेल्या. यात दोघी बुडाल्या तर दोघी सुखरूप बाहेर निघाल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकीचा मृतदेह सापडला, दुसरीचा शोध सुरु

मृतांपैकी एक अल्पवयीन मुलगी आहे. लीला दासांना असे बुडालेल्या २४ वर्षीय एका मुलीचे नाव आहे. तर १५ वर्षाची दुसऱ्या मुलगीचे नाव सतु दासाना असे आहे. एकाच घरातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, विरार, मांडवी पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरु केले.

अंधारामुळे शोधकार्यात अडचणी

यावेळी एका मुलीचा मृतदेह मिळाला पण एक मुलगी बेपत्ताच आहे. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता मुलीचा शोध घेणे सुरूच आहे. मात्र रात्रीच्या अंधारात शोध घेण्यास अडथळा निर्माण होत होता तरीही स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन दलाचे जवान, तसेच मांडवी विरार पोलिसानी जीवाची बाजी लावत दुसऱ्याही मुलीचा मृतदेह शोधून काढला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

गोंदिया पोलिसांचे अदानी प्रकल्पासमोर मॉक ड्रिल

पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

 

Comments are closed.