Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 31 जुलै : जिल्हा मुख्यालय नजीकच्या बोदली येथील एका विक्रेत्याकडून 12 हजार 600 रूपये किमतीची 42 लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
बोदली येथे गाव संघटन सदस्यांच्या माध्यमातून दारू बंदी होती. परंतु रोवणा सुरू असल्याने सदस्य कामात व्यस्त झाले. या संधीचा फायदा घेऊन विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केली. अशातच गावसंघटन , मुक्तीपथ, पोलीस यांचे संयुक्त कार्यवाहीत घराची झळती घेतली असता, आकाश पिपरे नामक व्यक्तीच्या घरातून 42 लिटर मोहफुलाची दारू, हातभट्टी अंदाजे किंमत 12600 रुपये जप्त करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.धनराज चौधरी, पोना सप्निल कुळवले, पोना.शेखर पुंगाठी, पोना. ऋषाली चव्हाण, पोशी.तुषार खोब्रागडे. मुक्तीपथ कार्यकर्ते रेवनाथ मेश्राम यांनी केली. यावेळी सरपंच आकाश निकोडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कुनघाडकर उपस्थित होते.
Comments are closed.