Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

सदर प्रकरणी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था : एका तरुणाला आयपीएस अधिकारी बनवतो म्हणून दोन लाख रुपयांना चुना लावला आहे. या तरुणाला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश दिला आणि पोलिसांत रुजू झाला असे सांगण्यात आले. पण रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. बिहारमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षांचा मिथलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यात रहिवासी. त्याच भागात राहणाऱ्या मनोज सिंहने त्याला पोलिसांत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी मनोजने मिथलेशकडे दोन लाख तीस हजार रुपये मागितले. तेव्हा मिथलेशने आपल्या मामाकडून दोन लाख रुपये घेऊन मनोजला दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://x.com/gharkekalesh/status/1837125833988690314?t=Fk4MUFC-C8yklzBtX48IXw&s=08

त्यानंतर मनोज सिंहने मिथलेशच्या अंगाचे माप घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला बोलावलं आणि त्याला आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश आणि खोटं पिस्तुल दिलं. आणि ड्युटी जॉईन करायला सांगितली. मनोज घरी आला आणि त्याने आईला ही खुशखबर सांगिली. दुसऱ्या दिवशी तो जवळच्या स्थानकात ड्युटी जॉईन करायला जात होता, तेव्हा रस्त्यातच त्याला पोलिसांनी हटकलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मिथलेशला पोलिस स्थानकात नेलं. तेव्हा मिथलेशने झाला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी मिथलेश आणि मनोज सिंहला अटक केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.