Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत तुषार दुधबावरे यांचे सुयश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती व स्व. माणिकराव घवळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर विधी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा 2025 (वर्ष23 वे ) आयोजित करण्यात आली होती.

‘राजकीय स्वार्थासाठी दिल्या जाणाऱ्या योजना लोकशाहीस घातक आहे ‘ ह्या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तुषार रमेश दुधबावरे, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना ‘उत्कृष्ट वादविवादपटू वक्ता’ ह्या पुरस्काराने श्री बळवंत वानखेडे खासदार,अमरावती लोकसभा आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री डॉ. पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्या डॉ. वर्षा देशमुख , सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ.अविनाश चौधरी, शाश्वत शाळेचे संस्थापक श्री. अतुल गायगोले, सुप्रसिद्ध वक्ते व आयोजक समिती प्रमुख प्रा. डॉ रत्नाकर शिरसाठ हे मंचावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

व्याख्यानमालेच्या बाबतीत राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी म्हणून एकूण राज्यातील एकूण ६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तुषार दुधबावरे यांनी प्रा. डॉ सविता गोविंदवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज व ग्रामीण भागातील समाज आणि त्यांच्या रोज उद्भवणाऱ्या समस्यांची वास्तविकता व शासनाच्या योजनांची सांगड’ या विषयाला घेऊन अतिशय आत्मविश्वासपूर्वक वक्तव्य मांडले. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य व अभ्यासपूर्ण वादविवाद कौशल्य विकसित होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील, विविध विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांना एक राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करण्याचा आयोजकांचा दरवर्षी प्रयत्न असतो.

तुषार दुधबावरे यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, तसेच मार्गदर्शिका प्रा. डॉ सविता गोविंदवार, स्पर्धेतील सहकारी मित्र मंगेशबाबू मामीडवार तथा पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातील इतर प्राध्यापक डॉ. हेमराज निखाडे, डॉ. नीळकंठ नरवाडे व प्रा. अमोल चव्हाण तसेच अर्थशास्त्र विभागातील डॉ. धैर्यशील खामकर व डॉ. महेंद्र वर्धलवार यांना दिले. त्याच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू व प्र – कुलगुरू यांनी तुषार दुधबावरे व मराठी विभागाचे अभिनंदन केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर

नक्षल्यानी पोलिसांच्या वाहनाला स्फोटकाच्या हल्ल्यात उडविले 9 पोलीस जवान जागीच शहीद ; तर सात गंभीर

 

Comments are closed.