Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लग्न समारंभात वरात घेऊन जाणारा टेंम्पो पलटी; अपघातात १८ वऱ्हाडी गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. ९ एप्रिल :  आर्वी तालुक्यात लग्नसमारंभा करीता वरात टेंम्पोने आर्वीकडे जात असतांना अचानक टेम्पो वाढोना बेडोना घाटात पलटी झाल्याने भयंकर अपघात झाला. त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदत करत अपघातग्रस्तांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात आर्वी येथे भरती केले.

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील सहकार मंगलकार्यालयात वर प्रफुल गोपाळराव जाधव रा. गारपीट यांचे वधू अश्विनी भालचंद्र पवार रा. पाचोड यांचे लग्न आयोजित केले होते. लग्नसमारंभात उपस्थित होण्यासाठी काही वराती टेम्पोनी पाचोड येथून आर्वीला येत असतांना वाढोना बेडोना घाटात अपघात झाला. १८ ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वर्धा येथे पाठविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि बाब आर्वी मतदार संघाचे भाजपा आमदार दादाराव केचे यांना कळता त्यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांची एकंदरीत वैद्यकीय स्थितीबाबत डॉक्टरांकडून जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्याबाबत दक्षता पाळणे गरजेचे अत्यावश्यक असल्याने अपघातग्रस्तांना तातडीने वर्धा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. आमदार दादाराव केचे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आमदार केचे यांची सुद्धा या लग्न समारंभात उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे परिचारकाची गळफास घेऊन आत्महत्या

विकासाच्या नव्या युगात उद्योगांची भूमिका महत्वाची; उद्योजकांनी सामाजिक विकासासाठीही योगदान देणे गरजेचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

 

 

Comments are closed.