Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माझी वंसुधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.१७ फेब्रुवारी :  संचालक राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. श्याम खंडारे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय,सावली येथे भेट दिली. या भेटी दरम्यान रासेयो वार्षिक अहवालाची तपासणी करण्यात आली व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी डॉ. श्याम खंडारे यांनी विद्यार्थ्यांना स्वतः आत्मनिर्भर बनून, समाजसेवा व देशसेवा कशी करता येईल तसेच माझी वंसुधरा या अभियानातून विद्यार्थ्यांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक करणे महत्त्वाचे आहे . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चांद्रमोली, रासेयो स्वयंसेवक, व रासेयो कार्यक्रम अधीकारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नद्या, सुंदर हिरवळ आणि इतर अनेक सुंदर गोष्टी निसर्गात आहे. त्यामुळे ही पृथ्वी सुंदर बनते .झाडे आणि वनस्पती देखील आपल्या जीवनात सर्वात मोठा भाग बनतात. कारण आपल्याला वनस्पती द्वारे ऑक्सिजन मिळतो. झाडे-झुडपांमुळे पाऊस पडतो. आपल्या आजूबाजूला कडुलिंब, दुर्वा ,तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायला हवी .वाढत्या वृक्ष तोडीमुळे मानवाच्या अस्तित्वावर आघात होतो आहे. माणूस आपले सौंदर्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो .पण या वंसुधरेची काळजी घेणेही आपली जबाबदारी आहे. असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यापीठात साजरा होणार कला व क्रीडा महोत्सव

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…

 

Comments are closed.