Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘फास’ मराठी सिनेमा 4 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

बुलडाण्यात घेतली पत्रकार परिषद. रविकांत तुपकरांनीही साकारली भूमिका.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. २९ जानेवारी : शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीवर व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा ‘फास’ हा मराठी चित्रपट ४ फेबुवारी संपूर्ण राज्यात एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या सिनेमात शेतकऱ्यांभोवती असलेल्या वास्तव समस्या मांडण्यात आल्या असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

प्रसिद्ध सिने अभिनेते कमलेश सावंत यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली असून सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही या चित्रपटात भूमिका साकारली असल्याचे बुलढाण्यात झालेल्या पत्रपरिषदेत सांगण्यात आले. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“माँ एंटरटेनमेंट’’ प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ हा चित्रपट समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाद्वारे अतिशय महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने वाढत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.