Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

VIDEO: अभिनेत्री कृतिका अवस्थीचा स्तुत्य उपक्रम..

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वाटल्या चप्पला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रतिनिधी: किरण दुपारे वाडा,पालघर :- टीव्ही स्टार अभिनेत्री कृतिका अवस्थी आणि तिच्या सहकाऱ्यांनी वाडा तालुक्यातील खुपरी आणि गौरापुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना मोफत चपला वाटप केल्या. तसेच मुलांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत गीते, अभंग तसेच तारपा नृत्य करून स्वागत केले.यावेळी अभिनेत्री कृतिकाला देखील तारपा नृत्य करण्याचा मोह आवरला नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाडा तालुक्यातील काही मुलांना २-३ किलोमीटर अंतर पायी चालत शाळांमध्ये जावं लागतं. याचीच दखल घेत अभिनेत्री कृतिका अवस्थी आणि तिच्या सहकाऱ्यांनी खुपरी आणि गौरापूर येथील जिल्हा परिषद शाळेत अनवाणी शाळेत येणाऱ्या मुलांना मदत व्हावी यासाठी चापालांचे वाटप केले. मुंबईतल्या ग्रीन सोल चप्पल या कंपनी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी अभिनेत्री कृतिकाने स्वतः मुलांच्या पायात चपला घातल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षकांनी कृतिका आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानून कृतज्ञात व्यक्त केली. तर, या वेळी अभिनेत्री कृतिकाने तारपा नृत्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसमवेत आनंद लुटला.

या कार्यक्रमात अभिनेत्री कृतिका अवस्थी सोबत श्री.रमेश धामी, मोहन पाटील सर, सुनिल जाधव सर उपस्थित होते. तसेच, राजेंद्र पाटील, चंद्रकांत भोईर, मयुर शेलार, गणेश धुळुगुडे, गोविंद वाक्षे, सौ.विशाखा पाटील आणि सौ.सारिका यादव या शिक्षकवृंदाने आलेल्या मण्यावरांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.