Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी पोलीसांचे धाड मोहीम; विना मास्क दुकानदारांवर दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारची नियमावली जाहीर केली आहे.

जीवनावश्यक वस्तू विकण्यास दुकानाचा वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असतील पण मास्क व सुरक्षित अंतर ठेवून विक्री करण्यात यावे असे नियम असतांना देखील अहेरी येथील बाजारवाडीत भाजीपाला दुकानदार या नियमांचा उल्लंघन करतांना पोलीस प्रशासनाचा निदर्शनास आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी अनेक दुकानदारांवर विना मास्क विक्री करतांना पकडले असून त्यांच्यावर दंड वसूल करण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांचा नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

पोलीस व आरोग्य विभागाला नागरिकांनी व व्यापारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

Comments are closed.