Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महसूल अदालतमध्ये ७०० लाभार्थ्यांना लाभ

गोंदिया तालुक्यात सर्वत्र आयोजन "जनसंवाद व महसूल अदालत"

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गोंदिया, 5 ऑगस्ट 2023 : महसूल सप्ताहानिमित्त गोंदिया तालुका महसूल विभागाच्या वतीने आयोजित जनसंवाद व महसूल अदालत मध्ये गोंदिया तालुक्यातील नागरिकांना विविध प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला. गोंदिया तालुक्यामध्ये महसूल सप्ताह निमित्त प्रत्येक तलाठी तसेच मंडळ कार्यालयात “जनसंवाद व महसूल अदालत” (४ ऑगस्ट ला) आयोजित करण्यात आली होती. जवळपास ७०० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तथा योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यावेळी गावागावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार शमशेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यक्रमास तालुकाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या कार्यक्रमात खालील प्रमाणे विषयांचे अर्ज प्राप्त झाले व तसेच काही समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. नमुना 8अ -93 वाटप, 7/12 उतारा -192 वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र – 89 वाटप, प्रलंबित फेरफार-23 निकाली, सलोखा योजना-13 अर्ज प्राप्त खरेदी विक्री, वारस फेरफार-92, कलम 155 अंतर्गत दुरुस्ती-37, संजय गांधी योजना अर्ज-56 प्राप्त, श्रावण बाळ योजना अर्ज- 65 प्राप्त, पांदन रस्ते खुले केले-5 आदी लाभाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येते आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.