Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकसपर्श न्यूज नेटवर्क 

वर्धा: जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक चारचाकी कार उलटून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरहून शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावर चॅनेज क्रमांक ७० – ५०० या मार्गावर पहाटे सातच्या सुमारास हा अपघात घडला.

वाहन चालवत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाला झोपेची डुलकी आल्यानं कार उलटून बॅरिकेट्सना धडकल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्र, समृद्धी महामार्ग कर्मचारी तसंच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.