Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली- नगर पंचायत निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ग्रामपंचायत निवडणुकीत ७३.७२ मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  दि. २१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यात आज झालेल्या ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ४६ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ७३.७२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरची नगर पंचायतीत सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात आज कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या नऊ नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होती. तसेच ४६ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी पोटनिवडणूक होती.

नगर पंचायत निवडणुकीत दुपारी ३ वाजतापर्यंत ७५.४१ टक्के मतदान झाले. अहेरी येथे ६९.२, सिरोंचा ७४.५२, एटापलली ०४.०४, भामरागड ६७,४९, चामोर्शी ७८.६८, मुलचेरा ८७.७३, धानोरा ७९.१५, कुरखेडा ७९.२५, तर कोरची नगरपंचायतीत ८८.८६ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत ७३.७२ टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित घटना घडली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

Comments are closed.