Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २१ डिसेंबर :  नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील व अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता (भा.प्र.से.) यांचे संकल्पनेतून प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी प्रथमच पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात कोणतीही अनुचित प्रकार न घडता ७४.०४ टक्के मतदान पार पडले. यात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथची संकल्पना राबविली गेली. त्यामध्ये समूह निवासी शाळा खोली क्रमांक २ येथे पहिल्यांदाच सर्व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच बंदोबस्तासाठी महिला यांची नेमणूक करण्यात आली.

 

सदर उपक्रमात संपूर्ण बूथ, बुथचे प्रवेशद्वार तसेच लक्षवेधी सेल्फी पॉईंट साठी गुलाबी रंगाचा कपडा, गुलाब फुगे व साहित्य वापरण्यात आले होते, महिला स्टाफ यांनीदेखील गुलाबी पोषखातच आपले कर्तव्य पार पाडले.

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

सदरचा उपक्रम राबविण्यासाठी प्रदीप शेवाळे तहसीलदार एटापल्ली यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी चोख बंदोबस्त कर्तव्य पार पाडले.

या अनोख्या उपक्रमाचे उमेदवार, मतदार व सामान्य नागरिक यांनी स्वागत केले तसेच या उपक्रमातून प्रथमच महिला सक्षमीकरणाबाबत निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच सकारात्मक संदेश देण्यात आला.

हे देखील वाचा: 

मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक

उद्यापासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

Comments are closed.