Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावात आलंया भूत!.. गावाला भुताने झपाटल

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • अमरावतीत एकाच वेळी ३५ महिलांच्या अंगात भूत संचारल्याने दहशतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३१ मार्च: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात पारधी समाजात ३० ते ३५ लोकांच्या एकच वेळी भूत अंगात आल्याचा समज निर्माण झालाय. या भुतामुळे संपूर्ण गाव दहशतीमध्ये आलेलं आहे. अंगात भूत येत असल्याने लहानग्या पासून तर मोठे व्यक्ती सुद्धा घुमू लागलेत. गावातील लोकांना भुताने झपाटले आहे. असे मांत्रिकाने सांगितल्याने गाव भयभीत झालेलं दिसत आहेत. अंगात आलेलं भूत उतरविण्यासाठी मांत्रिक महिलांना सुद्धा अमानुष मारहाण करत आहेत. या बाबत प्रश्नचिन्ह शाळेचे मतीन भोसले यांनी अनिसला हा सगळा प्रकार सांगितला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत त्यांनी नागरिकांना समुपदेशन करीत अंधश्रद्धा विषयी प्रबोधन केले. मात्र अशिक्षित पारधी समाजाचे लोकांनी मांत्रीकाच्या मनाने भूत उतरविण्यासाठी सावंगा विठोबा येथे गेलेत. याबाबत मतीन भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलीस घटनास्थळी पोहचताच मंत्रिकांनी तेथून पळ काढला. फासे पारधी समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मंत्रिकांचे म्हणणे ऐकून हे नागरिक अंधश्रध्दाला बळी पडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने या बाबतीत गांभीर्य ठेऊन अंधश्रद्धा पसरविणाऱ्या मांत्रीकविरुद्ध जादूटोना कायद्याविरुद्ध कारवाई होणे गरजेचे असल्याचं मतीन भोसले याचं म्हणणं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.