Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजादी का अमृत महोत्सव निमित्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ब्रम्हपुरी, दि. १० जून : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाकडून आजादी का अमृत महोत्सवा निमित्त्याने शासनामार्फत नवनवीन कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून क्षितिज महिला प्रभाग संघ आवळगाव – मूडझा तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर दोनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यात वार्षिक सर्वसाधारण सभा तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात घेण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप नरुले सर साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, गिरगाव तालुका जिल्हा गडचिरोली. उद्घाटक गुरुदेव जी वाघरे उपसरपंच वांद्रा तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोज मेश्राम तालुका अभियान व्यवस्थापक तथा व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती ब्रह्मपुरी दिनेश जांभूळकर, अमोल मोडक तालुका व्यवस्थापक ब्रह्मपुरी, किशोर अलोने, निराशा ताई तोंडफोडे सरपंच्या ग्रामपंचायत आक्सापुर, संजय लोणारे उपसरपंच हळदा, रुपेश बानबले, अतुल जीवतोडे, रेवन सातपुते, संध्या गिरडकर, भाग्यश्री आंबोरकर आवळगाव, प्रीतम बाबनवाडे सदस्य ग्रामपंचायत आवळगाव, सौ. वंदना दुपारे अध्यक्ष लक्ष महिला प्रभाग संघ आणि मुडझा , हळदा, आवळगाव, आक्सापुर, वांद्रा डोरली, चिचगाव येथील विविध पदाधिकारी, महिला प्रभाग संघ व बचत गट उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मुडझा – आवळगाव प्रभाग संघातील महिलांनी गावातील रस्ते झाडून स्वच्छ केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी दुसऱ्या दिवशी प्रभाग संघाचे लेखा पुस्तक, आर्थिक विवरण पत्र व लेखापरीक्षणाचे वाचन करून कृती आणि पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक, वार्षिक अहवाल तयार करण्याबरोबरच झालेल्या प्रगतीच्या आढाव्याचे वाचन करण्यात आले.

मुडझा – आवळगाव प्रभाग संघातील महिला आणि त्यांची मुले- मुली यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या विविध लेझीम, रेकॉर्डिंग नृत्याने व कलाकारीने, गोड आवाजाने आवळगाव वासियांचे मने जिंकून पुरुषांच्या पुढे महिला जात आहेत हे त्यांनी दाखवून दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संघांना चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

१) उत्कृष्ट सीआरपी-सौ. गिता यशवंत निकोडे आक्सापुर.
२)उत्कृष्ट ग्रामसंघ – संघर्ष महिला ग्रामसंघ वांद्रा .
३) उत्कृष्ट पशु सखी -सौ. गुड्डी आंबोरकर आवळगाव .
४) उत्कृष्ट कृषी सखी – सौ ज्योती दोनाडकर बरडकीन्ही.
५) उत्कृष्ट ग्रामसंघ लिपिका- आधार ग्रामसंघ हळदा
६) उत्कृष्ट समूह – बिरसा मुंडा संघ कोसंबी.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश अलोने कृषी व्यवस्थापक, दिनेश जांभुळकर, पंचायत समिती प्रभाग संघ पदाधिकारी ब्रह्मपुरी व मुडझा- आवळगाव या प्रभागातील महिलांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निराशा मनोज गेडाम प्रभाग संघ मॅनेजर यांनी तर आभार प्रतिभाताई शेंन्डे आवळगाव यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.