Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकिट आता 10 रू. वरून थेट 50 रू.

मुंबईकरांना दिवाळीत मोठा धक्का, आज सकाळपासूनच नवे दर लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 22 ऑक्टोबर :-  दिवाळीनिमित्त रेल्वे स्थानकावर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ने प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. सणासुदीच्या काळात, रेल्वे स्थानकावर गर्दी मुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी आणि अनावश्यक लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे ने आपल्या काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. आज सकाळपासूनच वाढलेले दर लागू झाले आहेत.

सणासुदीच्या काळात होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शनिवारपासून मुंबईसह गुजरातमधील मुख्य स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर आता 10 रूपयांवरून 50 रूपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र, या किमती तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आल्या आहेत. ही दरवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू राहणार आहे. मध्य रेल्वे वर मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली, वांद्रे टर्मिनसवर प्लॅटफाॅर्म तिकिटात वाढ करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले कि, नवीन दर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल येथे लागू होतील. ही स्थानके लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सर्वात जास्त गर्दी असणारे जंक्शन आहेत.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता ही वाढ करण्यात आल्याचेही शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांमध्ये अशी तात्पुरती वाढ मुंबईच्या विभागीय रेल्वेने गेल्या दोन वर्षात अनेक वेळा लागू केली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत या स्थानकांवर दरवाढ करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

T20 World cup 2022 : न्यूझिलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

ऐन दिवाळीत करंट लागून गेला लाईनमन का जीव

Comments are closed.