Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवांची पुजा करून केला सरकारचा निषेध!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला आगार क्रमांक एकवर गेल्या ३० दिवसापासून राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. पण अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून कुठल्याच प्रकारची उपायोजना व अद्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून ते आपल्या निर्णयावर ठाम आहे.  

अकोला, दि. १ डिसेंबर:  अकोल्यातील आगार क्रमांक १ वरील एसटी कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरात गाढवांची पूजा करून त्यांच्या समोर आपल्या मागण्या मांडल्या. गाढवांचे पाय धुवून, त्यांना हार घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. गाढवांच्या आशीर्वादाने मागण्या मान्य होतील अस कर्मचाऱ्यांनी म्हटलं. गाढवांचा आशीर्वाद घेऊन एकप्रकारे एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अकोल्यात आज पर्यंत एकही बस आगरच्या बाहेर गेली नसून आंदोलन करत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आधीच कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांनी मागील ४ आठवडे एसटी पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात राज्यातील प्रवाशांनाही प्रवासासाठी अडचणी येत आहेत. यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई

 

Comments are closed.