Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन तात्काळ आर्थिक मदत करा.. विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महा आंदोलनासाठी तयार रहा- कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई दि. ३ डिसेंबर : राज्यात होणारा सततचा अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे गेली पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेला शेतकरी आता हतबल, हताश व उध्वस्त झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांबाबत शासनाची उदासीन भूमिका चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई एकरी रु.२५०००/- देण्यात यावी आणि सक्तीच्या कर्जवसुलीला स्तगिती देऊन संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. एका बाजूला कोरोना महामारीचे संकट असताना सर्व उद्योग धंदे बंद किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ असताना शेतकऱ्यांनी मात्र त्यांचे काम अविरत सुर ठेऊन अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू ठेवले, परंतु सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच कोरोनाचे भीषण सावट व सतत होणाऱ्या लॉकडाउनचे संकट त्यामुळे निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न भीषण स्वरूप धारण करत आहे .गेली सतत पाच वर्ष पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे नष्ट झाला. शेतकरी करीत असलेला वीट भट्टी ,गवत पावली विक्रीचा व्यवसाय व भाजीपाला लागवड वाया गेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची साधने बंद झालेली आहेत दुसरीकडे शासनाने कर्जमाफीचे धोरण योग्य पद्धतीने न राबविल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली आहे .बँकांनी जबरदस्तीने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा लावून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने या सर्व परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना विशेषबाब म्हणून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी विश्वनाथ पाटील यांनी केली आहे.

कुणबी सेनेच्या मागण्या-
१) महाराष्ट्रात तातडीचा ओला दुष्काळ जाहीर करावा.
२) संपूर्ण महाराष्ट्रात सरसगट पाऊस पडल्याने पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई एकरी
रु.२५०००/- देण्यात यावी.
३) सक्तीच्या कर्जवसुलीला स्तगिती देऊन संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.

सत्तेत मश्गुल असलेले राजकारणी दर महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सक्रिय असून, जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नात त्यांना रस उरलेला नाही असा आरोप करत नोकरशाही भ्रष्टाचारात दंग असून प्रशासन ठप्प आहे .अशा वेळी केवळ एखादे निवेदन देऊन परिस्थितीत फरक पडणार नाही असा आरोप विश्वनाथ पाटील यांनी केला आहे. तसेच, ऑनलाइन पंचनामे केले जातील अशी खोटी आश्वासने शेतकऱ्यांना मिळतील ,पावसाने उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सरकारने आपल्या मागण्यांची योग्य ती घेतली नाही तर आर पारच्या लढाईशिवाय पर्याय नाही. म्हणून आता महा आंदोलनासाठी सर्व शेतकरी वर्ग तरुण तरुणींनी तयार राहावे असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्री कशी घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा एस टी कामगारांच्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले यात शंका नाही.

हे देखील वाचा,

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवांची पुजा करून केला सरकारचा निषेध!

 

 

Comments are closed.