Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात: ट्रकने दिली प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक, धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

ट्रक ने प्रवासी वाहतूक रिक्षाला धडक देवून पळून जाण्याच्या नांदात ट्रक चालकाने पुन्हा  एका दुचाकीसह टाटा एसी गाडीला दिली धडक.

सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. ८ मार्च: ट्रकचालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवत पांगरबावडी येथे एका प्रवाशी रिक्षाला आणि घोडका राजुरी येथे दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातात चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. तसेच दुचाकीवरील दोघे देखील गंभीर जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या भयावह घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीसाच्या माहितीनुसार, वडवणी येथून एक रिक्षा प्रवाशी घेऊन येत होता. यावेळी बीडकडून वडवणीकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-09 सीव्ही-9644) पांगरबावडी येथे रिक्षाला जोराची धडक दिली.

या अपघातात रिक्षातील तबसुम अबजान पठाण, शारो सत्तार पठाण, रिहाण अजान पठाण (वय 13), तमन्ना अबजान पठाण (वय 8) व अन्य एक अशी मयतांची नावे आहेत. तर रिक्षा चालक सिद्धार्थ शिंदे, जायबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे, गोरख खरसाडे अशी जखमींची नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर या ट्रकने राजू रोथे यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्डयात जाऊन पलटी झाला. घटनेची माहिती होताच घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक  पवनकुमार राजपुत यांच्यासह आदींनी धाव घेतली आहे. ट्रक चालक फरार झाला असून पोलीस पुढील तपास करून  कारवाई करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.