Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर -राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 15 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, ना.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळयास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी,  जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे तसेच यावेळी इतर पदाधिकारी व अधिकारी,कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री महोदयांनी जनतेला उद्देशून भाषण केले. नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली. राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे सर्वांचे कर्तव्य आहे असे म्हणाले. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान आहे. जिल्हयातील भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच असल्याचे ते यावेळी म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुढे बोलतांना श्री. यड्रावकर यांनी माहिती देतांना सांगितले की, शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप व्दारा  गा.न.नं.12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा “ई-पीक पाहणी” कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आज होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या ग्राम सभेत ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती पालक, अधिकारी, तलाठी/कृषी सहाय्यक कर्मचाऱ्या मार्फत ग्राम सभेला देण्याबाबत संबंधीत विभागाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

सद्या कोरोना संसर्गामूळे जगासह संपूर्ण भारत देशात विविध बंधने आहेत. गडचिरोली जिल्हयातही सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जनतेने केलेल्या सहकार्यामूळे आज कोरोनाला रोखण्यात चांगले यश मिळत आहे. कोरोना काळात गरजू इमारत व बांधकाम कामगारांनाही मदतीचा हात देवून शासनाने सहाय्य कले. यावेळी गडचिरोलीमधील 44608 कामगारांना 1 कोटी 87 लक्ष रूपये मदत देण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी त्यांनी पोलीस विभागाला मिळालेल्या पदकाबद्दल माहिती देतांना पुढे सांगितले की, पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडुन सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे यड्रावकर म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामांबद्दल बोलले, महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तथा जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेत प्रशासनातील व पोलीस दल, आरोग्य व इतर विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे पायाभूत सोयी सुविधा यावर भर देण्यात येत आहे. दळणवळणाची कामे मोठया प्रमाणात प्रगतीपथावर असून गडचिरोली जिल्हा मुख्य प्रवाहात येत असून भविष्यात राज्यात इतर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा हा विकासात अग्रेसर असेल.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांचा सत्कार : महाआवास अभियान ग्रामिण अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार अंतर्गत जिल्हास्तरावरील उत्कृष्ठ तालुका यामध्ये कोरचीला प्रथम क्रमांक असून श्रवणकुमार मातलाम सभापती पं.स.कोरची यांनी स्विकारला. जिल्हास्तरावरील उत्कृष्ठ ग्रामपंचायत यामध्ये ता. आरमोरी येथील देलनवाडी प्रथम. जिल्हास्तरावरील उत्कृष्ठ ग्रामिण गृहनिर्माण अभियंता ता. आरमोरी राकेश चलाख. जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्था मध्ये संस्कार संस्था, एटापल्ली ता. एटापल्ली जि. गडचिरोली. जिल्हास्तरीय युवा  पुरस्कार (युवक) यामध्ये अनुप वसंत कोहळे यांना तर सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली  येथील प्रशांत ढोंगे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना कोविड काळात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल. आधारविश्व फाऊंडेशन, गडचिरोली येथील श्रीमती गिता हिंगे (अध्यक्ष), ॲङ कविता मोहरकर (सदस्य), श्रीमती दिलशाद पिरानी (सदस्य), यांना कोविड काळात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले  व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय, गडचिरोली  तालुका कृषी अधिकारी, धानोरा येथील आनंद मुरलीधर पाल  यांना विविध विस्तार विषयक योजनामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सुत्रसंचलन ओमप्रकाश संग्रामे व नितेश झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे यांनी केले.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात 2 नवीन कोरोना बाधित तर 7 जण कोरोनामुक्त

 

लाल किल्यावरील संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा …

 

काबुलवर तालीबान्यांचा कब्जा

 

 

Comments are closed.