Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे महिलांची आरोग्य तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २० मार्च : राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली तर्फे प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत आज अहेरी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, पोलिस उपनिरीक्षक आरती नरोटे, डॉ.चेतन इंगोले, अहेरी विधानसभा महिला अध्यक्ष पुष्पा अलोने, अहेरी विधानसभा महिला निरीक्षक ज्ञानकुमारी कौशी आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वांसाठी राब राब राबणाऱ्या महिला स्वतः साठी वेळ काढू शकत नाही त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते म्हणून अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजण करण्यात येत असलयाचे उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आरोग्य तपासणी दरम्यान महिलांची बीपी, शुगर, मासिक पाळी समस्या व ईतर आजारांवर तपासणी करण्यात आली. महिलांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महिलांंसाठी गीतगायनासह विविध स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होते. गियगायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलिया पठाण, दुसरा क्रमांक माहेश्वरी कर्णेवार, रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सपना मुप्पावार द्वितीय उषा दुर्गम व रैना सल्लावार यांनी पटकाविला.मान्यवतरांतर्फे त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष आरती डुकरे तर आभार जयश्री चिलवेलवार यांनी मानले

हे देखील वाचा : 

अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!

चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

 

Comments are closed.