Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“ह्या” भाजपच्या उमेदवाराने मोडला अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम , देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला नवा आमदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

 वृत्तसंस्था दि.१० मार्च: उत्तरप्रदेशातून संरक्षण मंत्री राजनाथ  सिंह यांचे पुत्र पंकज सिंह  यांचा विजय झाला आहे.  उत्तरप्रदेशातील नोएडामधून पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 091 मते मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत आजवरचा देशातील सर्वात जास्त मतांचा विजय आहे.

भाजपचे पंकज सिंह यांना 70.84 टक्के मतं मिळाली आहेत. पंकजा सिंह यांच्या विरोधात उभे असणारे सपाच्या उमेदवाराला  62 हजार 722 मते मिळाली होती.  तब्बल 1 लाख 79 हजार मतांनी जिंकून विजयाचा एक नवा रेकॉर्ड उभा केला आहे. विधानसभा निववडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे.  या आधी  महाराष्ट्रातून अजित पवारांचा 1 लाख  65 हजार मतांच्या फरकारने विजय मिळवला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अजित पवारांनी त्यांच्या पारंपारिक बारामती या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकावेळी   विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.

पंकज सिंह यांनी मानले जनतेचे आभार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उत्तरप्रदेश विधानसभा निकालानंतर भाजप नेते पंकज सिंह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. पंकज सिंह ट्विट करत म्हणाले, नोएडावासीयांनी दिलेल्या प्रेम, आशिर्वादामुळे  ही निवडणूक जिंकली आहे. जनता, पदाधकारी, कार्यकर्ते यांच्यामुळे हा विजय मिळाला आहे.

उत्तरप्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता

देशाच्या सत्तासमीकरणांत सर्वात महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आली आहे. पाच वर्षांपूर्वी मोठा विजय मिळवलेल्या भाजपला तिथं पुन्हा सत्ता मिळाली आहे.  उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133  जागांवर समाधान मानावं लागलंय.  तिकडे  बसपा  तिसऱ्या स्थानी तर  काँग्रेस  चौथ्या स्थानी पोहोचलं आहे.

हे देखील  वाचा :

गोव्यात भाजपने पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रीक, भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार

पंजाबमध्ये आप पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साफ !

पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Comments are closed.