Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाने आई-वडिलांचं छत्र हिरावलेल्या प्रियांशीला धनंजय देशमुख यांनी आर्थिक मदत करत घेतलं शिक्षणासाठी दत्तक..

प्रियांशीचा सांभाळ करणाऱ्या आजीला अश्रू अनावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि २३ मार्च :  बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या लेकीला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत करत बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतल आहे.

या पोरक्या झालेल्या लेकीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन धनंजय देशमुख यांनी एक सामाजिक संदेश दिला आहे. राजकीय नेत्यांच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च करत हजारो रुपये उधळण्यापेक्षा, अशा समाजातील वंचित आणि गरजू घटकापर्यंत मदत पुरवल्याने या पोरक्या जिवांना जगण्याचं बळ मिळेल, यावेळी अशी अनपेक्षित मदत मिळाल्याने प्रियांशीचा सांभाळ करणार्‍या आजीला अश्रू अनावर झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

पोलीसांची अशीही माणुसकी

 

 

Comments are closed.