Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो फ्रीस्टाइल गटात धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. याच कारण आहे तिचं वजन. मर्यादेपेक्षा तिच वजन जास्त होतं. त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली.

ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली आहे. IOA ने माहिती दिलीय की, 50 किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आलय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी तितकच किंवा त्यापेक्षा कमी वजन कायम ठेवावं लागतं. विनेशने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन हे यश मिळवलं होतं. विनेश फोगाट 53 किलो वजनी गटात खेळायची. पण ऑलिम्पिकसाठी तिने 3 किलो वजन कमी केलं. ती 50 किलो गटात उतरली. मंगळवारी रात्री विनेशच वजन 52 किलो होतं. ती कालची अख्खी रात्र झोपली नाही. वजन कमी करण्यासाठी जे केलं पाहिजे, ते सर्व तिने केलं. जॉगिंग, सायकलिंग सर्व काही. पण अखेर पदकाने हुलकावणी दिलीच.

विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही. आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल. मंगळवारच्या सामन्यांसाठी विनेशने तिचं वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं होतं. विनेश फोगाट यापूर्वी वेगळ्या वजनी गटात खेळायची. त्यावेळी तिचे वजन साधारण 56 किलो इतके होते. मध्यंतरी विनेश फोगाटला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तरीही विनेश फोगाटने नेटाने ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरु ठेवली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या स्पर्धेपूर्वी काही महिने आधी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्ती फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. विनेश फोगट हीदेखील या आंदोलनाचा भाग होती. कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी भाजपचे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते आहेत. अनेक दिवस दिल्लीत त्यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. या सगळ्या आंदोलनामुळे विनेश फोगाटचे ऑलिम्पिकसाठीच्या तयारसाठीचे सहा महिने वाया गेले होते. मात्र, त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यांत विनेश फोगाटने ऑलिम्पिक स्पर्धेची कसून तयारी केली होती.

 

Comments are closed.