Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजप आमदार नितेश राणे उपचारा करिता सीपीआरमध्ये मधे दाखल

शिवसैनिक हल्लाप्रकरणी अटक झालेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरात आणलं, सीपीआरमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर, दि. ८ फेब्रुवारी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्याप्रकरणी, भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं, त्यांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी, सोमवारी दि. ७ फेब्रुवारीला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआरमध्ये) दाखल करण्यात आले. सुमारे तासभर नितेश राणेंची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर त्यांना सीपीआरच्या हृदयरोग विभागातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

दरम्यान शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी, शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह मोठा पोलिस फाटा सीपीआर परिसरात तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नितेश राणे यांना सीपीआरच्या अपघात विभागात तपासणीसाठी नेण्यात आलं. तिथे काही तपासण्या झाल्यानंतर, त्यांना ह्रदयरोग विभागातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, जयंत रावराणे, संतोष कानडे, भाई सावंत यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे सचिन तोडकर, क्षत्रिय मराठाचे दिलीप पाटील, दयानंद नागठिळे हजर होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह!

भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

“या” शहरातील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

 

 

Comments are closed.