Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे नरेंद्र मोदींचा विकस आरसा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

दिल्ली,  दि.७ फेब्रुवारी : संसदेत अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी  सभागृहाला आणि राष्ट्राला उद्देशून आपले अभिभाषण केले. याच भाषणावर आज राज्यसभेत चर्चासत्रात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आपले मत मांडले. राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे नुसते अभिभाषण नसून तो मोदींचा विकास आरसा आहे असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

आठवले म्हणाले, मला कॉँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचा अनुभव आहे. मी दोनही पक्षात काम केले आहे. तसेच मला मंत्री नाही केले म्हणून मी कॉँग्रेस सोडली. जनता कॉँग्रेसवर नाराज होती म्हणून त्यांनी २०१४ साली भाजपची निवड केली. २०१९ साली ३०५ खासदार त्यांनी निवडून दिले आणि आता २०२४ साली ४०४ खासदार भाजपचे निवडून येणार असा दावा त्यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुढे त्यांनी कविता सादर करत कॉँग्रेस पक्षाला निशाण केला. देशात विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. आणि फक्त विरोधी पक्ष असणे गरजेचे नसून तो मजबूत असला पाहिजे तो जर नसेल तर वादाची परिस्थिति उद्भवते असे रामदास आठवले म्हणाले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह!

गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा दोंदे याची धडपड…

भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Comments are closed.