Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था : आपण एका माणसाच दोन वेळा लग्न झाले अस ऐकलं असेल पण तीन सख्या बहिणींनी एकाच माणसाला वर म्हणून निवडून एकाच मांडवात बोहल्यावर चढले असं कधी ऐकलं नसेल मात्र आफ्रिकेतील कांगो या देशात हि घटना प्रत्यक्षात घडलेली आहे.

या लग्नात तीन सख्ख्या बहिणी वधू असून त्या तिघींसोबत एका तरुणाने एकाच मांडवात लग्नगाठ बांधली आहे. असं म्हणतात की दोन जिवांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण या नियमाला अपवाद असणारं एक लग्न पार पडलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही घटना आफ्रिकेतील कांगो या देशात घडली आहे. या बहिणींची नावं नताशा, नताली आणि नादेगे असं आहे. तर या तिघींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं नाव लुविझो असं आहे, त्याचं वय 32 वर्षं इतकं आहे. तो सर्वात आधी नताशाला समाज माध्यमावर भेटला होता. त्यानंतर त्यां दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर एकमेकांवर प्रेम जळले.

नताशानंतर तो नादेगे आणि नताली या दोन्ही बहिणीला भेटला आणि तो त्यांच्याही प्रेमात पडला.  त्या तिघींनाही तो खूप आवडला. तिघींनीही त्याला लग्नाची गळ घातली. त्याला ही मागणी कळल्यावर सुचेनासं झालं आणि एकप्रकारे ह्रदय विकाराचा धक्काच येन बाकी राहिलं होत. पण विचारा अंती त्याने तिन्ही बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावास समंती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या तिघींशी त्याने एकाच मांडवात लग्न केलं. अर्थात या लग्नामुळे त्यांचे पालक खुश नव्हते. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्तही केली. त्यामुळे ते लग्नालाही हजर राहिले नाहीत. पण, त्याने विशेष काही फरक पडत नाही. कारण आपण या लग्नाने खुश आहोत, असं लुविझोचं म्हणणं आहे.

तिघींनी एकच नवरा करण्यामागचं कारणही नताशा, नताली आणि नादेगे यांनी आपल्याला लहानपणापासून एखादी गोष्ट शेअर करण्याची सवय असल्याने नवराही शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

हे देखील वाचा : 

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.