Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस.टी. कर्मचाऱ्याने विषप्राशन करून केली आत्महत्या.

कर्जबाजारी पणाला कंटाळून केली आत्महत्या.

लोकस्पर्शन्यूज नेटवर्क,

नांदेड दि,२२ मार्च :  मुखेड आगारातील चालक पदी असलेले गंगाधर मारोती येवतीकर या चालकाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली .

शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभरात एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे . राज्य सरकारने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुखेड तालुक्यात अशी घटना घडल्याने सरकारबाबत एस.टी. कर्मचाऱ्यांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे . शासनाच्या नाकार्तेपणामुळे विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, मागील पाच महिण्यापासुन पगार बंद असून यामुळे अनेक कर्मचारी ताणतनावात आहेत. याच ताणतनावातून व आर्थिक विवंचनेतून ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे आगारातील त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

मुखेड तालुक्यातील येवती येथील गंगाधर मारोती येवतीकर ( वय ४८ वर्ष ) हे २१ मार्च रोजी शहरानजीक असलेल्या कंधार फाटा येथे त्यांचे राहते घरात विषप्राशन केलेल्या अवस्थेत नातेवाईकांना दिसल्याने नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ६.१५ वाजता उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार करेपर्यंत मृत्यू पावल्याने डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!

धक्कादायक! शेतकऱ्याची स्वतच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या

Comments are closed.